प्राण्यांच्या भल्यासाठी सेवा करणे हे नोबेल कार्य आहे आणि आजची मोहीम त्या दिशेने एक पाऊल आहे – डॉ. तामलूरकर
October 30, 2021
अटकळी येथील बायोलॅब व जिरेनियाम प्लांट ला महिला बचत गटांची भेट…
दि: 27 ऑक्टोबर 2021 रोजी कृषि विज्ञान केंद्रा च्या अटकळी येथील उपकेंद्रात महिला बचत गटांची उद्योग उभारणी साठी बैठक झाली. डॉ. माधुरी रेवणवार यांनी उद्योग उभारणी बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले व तसेच महिलांना बायोलॅब, जिरेनियाम प्लांट दाखवण्यात आला व सविस्तर माहिती जीवन जाधव आणि मधुसूदन देशमुख यांनी दिली. व.ना.म.कृ.वी. परभणी विकसित फुले तोडताना शारीरिक कष्ट कमी होवुन काम सोपे व्हावे या हेतूने फुले तोडण्याच्या वेळी वापरावयाच्या बॅग ची चाचणी येथे घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी उमेद अभियानाच्या महिला बचत गट सदस्या मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

Comments are closed.