स्वच्छ दूध उत्पादन
November 4, 2022
राजमा लागवडीतून रब्बी हंगामात पिक बदल शक्य
November 4, 2022

आम्हीच पिकवतो पण खात नाही, खायचं कसं हेच माहीत नाही… अशी प्रतिक्रीया शेतकरी व शेतकरी महिलांनी आज धानोरा ता. हिमायतनगर येथील कार्यक्रमात दिली.

सोयाबीनच्या आहारातील समावेशामुळे पोषक तत्त्वांच्या अभावामुळे होणारे अनेक आजार कमी होतात. सोयाबीन मध्ये ऊर्जा, प्रथिने, लोह, कॅल्शियम ही पोषक तत्वे भरपुर आहेत. परंतु त्याचा आहारात योग्य वापर करण्याची पद्धत आजही अनेक जणांना माहिती नाही. हिमायतनगर आणि भोकर तालुक्यामध्ये सोयाबीनचे पीक जास्त प्रमाणात घेतल्या जाते. म्हणून त्याच्यावरील प्रक्रिया युक्त पदार्थ, मूल्यवर्धन अणि उद्योगातील संधी या विषयांवर आत्मा, कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील गृहविज्ञान तज्ञ डॉ. माधुरी रेवणवार यांनी आज दि. 10/102022 रोजी मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन पासून विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. कार्यक्रमासाठी भोकर आणि हिमायतनगर येथील अनेक शेतकरी महिलांची उपस्थिती होती. #farm #sagroli #food #kvk #nanded #rural #women #empowerment #SoyabeanFarming #kvksagroli #nanded #सोयाबीन 

Comments are closed.