महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, (MSRLM) नांदेड यांच्या अंतर्गत 5 दिवसीय निवासी आदर्श प्रभाग संघाचे आर्थिक व्यवस्थापन प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नांदेड मार्फत कृषि विज्ञान केंद्रातील उत्कर्ष लर्निंग सेंटर येथे दि.९ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान आदर्श प्रभाग संघ आर्थिक व्यवस्थापन निवासी प्रशिक्षण पार पडले…या प्रशिक्षणादरम्यान या अभियानाचे राज्य प्रशिक्षक श्री.शरद पवार यांनी प्रभाग संघामार्फत आर्थिक व्यवस्थापन कसे करावे,प्रभाग संघाचे आर्थिक उत्पादन-बचत,आर्थिक विमा-निवृत्ती,समुदाय आधारित संस्था द्वारे दिल्या जाणाय्रा आर्थिक सेवा,विमा जोडणी, आर्थिक समावेशन, प्रभाग संघाची आर्थिक उत्पादने व सेवा यांचा लेख्यावर होणारा परिणाम, आर्थिक व्यवस्थापनाचे मापदंड तसेच समुदाय आधारित संस्थाचे आर्थिक कृति आराखडा या विषयावर सविस्तर असे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास जिल्हा व्यवस्थापक श्री.द्वारकादास राठोड यांच्यासह जिल्ह्यातील ३० प्रभाग व्यवस्थापिका उपस्थित होत्या. #rural #womenpower #womensupportingwomen #womenempowement #womeninbusiness #womenempoweringwomen #selfhelp #selfhelpgroups #SHG #shgroup #kvk #Sagroli #nanded #MSRLM #SHGs #AmritMahotsav #UMED #training #trainingcamp #trainingcenter #youth #youthdevelopment #skilling #skill #skills #agriculture #agricultureworld #agriskills #agribusiness PMO India Nitin Gadkari Msrlm