World Bee Day 2021
June 10, 2021
टाळेबंदी व उद्योगाच्या संधी : कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व उमेद अभियान (ता.उमरी) तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न
June 10, 2021

उत्पादकता वृद्धी साठी सुधारित लागवड तंत्रज्ञान : शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन

गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे सोयाबीन व इतर खरीप पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन खरीप पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यां पर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रा तर्फे दि 29 मे रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी मान्सून चे वेळेवर होणारे आगमन व चांगल्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर व.ना.म.कृ.वि. परभणी चे संचालक, विस्तार शिक्षण, विद्यापीठाचे व कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ व कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. मराठवाड्यात सोयाबीन,कापूस व तूर ही मुख्य पिके असून त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते,यामूळे या महत्त्वाच्या पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञांनाची म्हणजेच उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, बीबीएफ तंत्रज्ञान, लागवडीचे अंतर, बियाणांचे प्रमाण, वातावरण बदलास अनुकूल तंत्रज्ञान , तणांचे व खतांचे व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती इ. माहिती व सर्वात महत्वाचे म्हणजे अधिक उत्पादन क्षम व वातावरण बदलास सहनशील अश्या नवीन प्रसारीत झालेल्या वाणांची ओळख शेतकऱ्याना होणे गरजेचे असल्याने या बाबींवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. 

या वेळी बाजारात सोयाबीन बियाणांची असलेली मागणी व त्याच्या पुरेश्या उपलब्धते बाबत व खतांच्या उपलब्धते बद्दल ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. येत्या 30 ते 35 दिवसां नंतर पीक संरक्षण व इतर व्यवस्थापन बाबत पुढील मार्गदर्शन केले जाणार आहे. #Farmer #Seed #Kharif #KVK #Sagroli #सोयाबीन #बीजप्रक्रिया #बीबीएफ #तंत्रज्ञान #वातावरणबदल

Comments are closed.