आर्थिक व्यवस्थापनाचे मापदंड तसेच समुदाय आधारित संस्थाचे आर्थिक कृति आराखडा या विषयावर सविस्तर असे प्रशिक्षण
March 24, 2022
रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम
May 10, 2022

 उन्हाळी भुईमूग समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी…

राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान अंतर्गत संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून उन्हाळी भुईमूग पीक प्रात्यक्षिक 10 हेक्टर 25 शेतकऱ्यांच्या शेतावर मौजे अंबुलगा तालुका मुखेड येथे राबवण्यात आले. हे प्रात्यक्षिक प्रयोगशील शेतकरी कृषिभूषण श्री मधुकर घुगे यांच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. वरील प्रात्यक्षिकाची पेरणी 20 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांनी केली. पीक अतिशय उत्कृष्ट आले असून सध्या 1.5 ते 2 महिन्याचे आहे. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.कपिल इंगळे व सहकारी श्री तुकाराम मंत्रे त्यांनी प्रात्यक्षिकातील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राला भेट देऊन पिक पाहणी केली व शेतकऱ्यांना पीक संरक्षण व पाणी व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पीक संरक्षण निविष्ठा बुरशीनाशक व मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 शेतकऱ्यांना देण्यात आले तसेच त्यांच्या जमीन पत्रिकेचे विश्लेषण करून माहिती देण्यात आली. #soil #soilhealthcard #kvk​​ #sagroli #nanded​​ #krushived #farm #farmer #agriculture #कृषिवेद #soiltesting #soilscience #soilheath #WaterIsLife #water #watertesting #soiltestingreport #watertestinglab #उन्हाळी #भुईमू #पीक #पाणी #व्यवस्थापन #बुरशीनाशक #summer #CropProtection #Cropsafety #crop #cropscience #CropSolutions #विकास #राष्ट्रीय #तेलबिया #पिके #अभियान
 

Comments are closed.