संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड येथे” उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन ” याविषयी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात बिलोली तालुक्यातील बेळकोणी बुद्रुक, बेळकोणी खुर्द, तळणी, बावलगाव, आरळी व कुंभारगाव येथील 40 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणानंतर बेळकोणी बुद्रुक येथील 15 शेतकऱ्यांना सोयाबीनचे विविध वाण ज्यात फुले संगम, फुले किमया व एम.ए.यु.एस -612 इत्यादी वाण उन्हाळी सोयाबीन स्वीकार्य चाचणी प्रयोगासाठी देण्यात आले. प्रशिक्षणात उन्हाळी सोयाबीन बीज उत्पादनाबद्दल सविस्तर माहिती ज्यात लागवड कालावधी, वाणाची निवड, बीज प्रक्रिया, लागवड पद्धत, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, भेसळ काढणे, काढणी, मळणी व साठवणूक करताना घ्यावयाची काळजी इत्यादी बाबी बद्दल कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा .कपिल इंगळे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणानंतर कृषी विज्ञान केंद्रा वरील उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन प्रक्षेत्र भेट देण्यात आली व बीजोत्पादन यातील बारकावे जाणून घेण्यात आले. #kvk #sagroli #nanded #agriculture #farm #krushived #कृषिवेद #farmer #soyabean #summer2022 #crop #उन्हाळी #उन्हाळीपिके #सोयाबीन #सोयाबीन_ #सोयाबीनसल्ला #बीजोत्पादन #शेतकरी