उन्हाळी हंगामात भात शेतीला पर्याय म्हणून “उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन” यासंदर्भात 50 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले…..
इटीगड्डा शेतकरी उत्पादक कंपनी बिर्कुर जिल्हा कामारेड्डी तेलंगणा राज्यातील शेतकरी कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड कडून उन्हाळी हंगामात भात शेतीला पर्याय म्हणून “उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन” यासंदर्भात 50 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनात योग्य लागवड कालावधी, वाणाची निवड, बीजप्रक्रिया, लागवडी चे अंतर व पद्धत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन व बीज उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी इत्यादी बाबी बद्दल सखोल माहिती देण्यात आली. येणाऱ्या उन्हाळी हंगामात या शेतकरी उत्पादक कंपनी कडून कृषी विज्ञान केंद्रा कडे दीडशे सोयाबीन बॅग (वाण: फुले संगम )ची मागणी नोंदवली आहे.
#Crop #soyabean
#farm #farmer #kvk #sagroli
#Nanded #agriculture
#krushived #कृषिवेद #SOYABEAN #AGRI #उन्हाळी #सोयाबीन
#बीजोत्पादन