उन्हाळी हंगामात भात शेतीला पर्याय म्हणून “उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन” यासंदर्भात 50 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले…..
December 7, 2021
जमिनीचे आरोग्य व माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, रब्बी पीक संरक्षण, उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
December 7, 2021
उमेद नांदेड जिल्हा वर्धिनीं ची एक दिवसीय निवासी कार्यशाळा उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न.
ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण कुटुंबांना समृद्ध,आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी सर्वसमावेशक लोकशाही तत्त्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार हक्क,विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून एक समर्पित व संवेदनशील संस्था राज्य जिल्हा व तालुका ञिस्तरावर उमेद अभियानातून केली जाते.
याच कार्याचा एक भाग व पुढील वर्षातील नियोजनासंदर्भात उमेद अभियानाचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक द्वारकादास राठोड यांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन कृषी विज्ञान केंद्राच्या उत्कर्ष लर्निंग सेंटर येथे पार पडली यामध्ये उमेद अभियानातील चालू वर्षातील कार्याचा आढावा व पुढील वर्षाचे नियोजन करण्यात आले. प्रसंगी कार्यशाळेस उपस्थित असलेल्या वर्धिनी व कार्यप्रेरिका यांना शिक्षण व प्रशिक्षण विभाग कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या मार्फत देखील मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित वर्धिनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे पुरविल्या गेलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. या शिबिरास मुदखेड भोकर बिलोली नायगाव देगलूर व मुखेड येथील तालुका व्यवस्थापकांची तसेच 90 वर्धिनीं ची तसेच विस्तार प्रेरिकांची उपस्थिती होती. #Training #Program #umed #Abhiyan #kvk #Sagroli #rural #womeninbusiness #womenempowerment #उमेद #नांदेड #वर्धिनी

Comments are closed.