एकात्मिक पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
कापूस हे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिक आहे व मोठ्या क्षेत्रावर कापसाची लागवड होते. कापूस पिकातील सर्वात महत्वाची किड म्हणून गुलाबी बोंडअळी ओळखली जाते. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाठ (खु.) ता. कंधार जि. नांदेड येथे “गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन” या विषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना सुरुवातीला गुलाबी बोंड अळीची ओळख व तिचा जीवनक्रम याविषयी मार्गदर्शन केले. गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक किड व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करताना त्यांनी बीटी कापसासोबत नॉन बीटी कापूस लागवडीचे महत्व, गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर, प्रकाश सापळ्यांचा वापर, मित्रकिटकांचे संगोपन आणि त्यांचा वापर, शिफारशीतील किटकनाशकांचा वापर ईत्यादीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसण केले. प्रशिक्षणासाठी ४४ पुरुष व महिला शेतकरी उपस्थित होते.
#cotton #integrated #pest #management #pinkbollworm #kvk #sagroli #Nanded #एकात्मिक #कीड #गुलाबी #बोंडअळीचे #व्यवस्थापन #AzadiKaAmritMahotsa
