ग्रामीण विकासासाठी “वातावरण बदलास अनुकूल समाज निर्माण” : संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व रिलायन्स फाउंडेशन इंडिया यांचा संयुक्त उपक्रम
September 22, 2022
एकात्मिक पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
September 22, 2022

कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व रिलायन्स फाउंडेशन कडून “कॉन्फरन्स कॉल डायल आउट करा – फार्मर फील्डशी कनेक्ट करा ” उपक्रमाची सुरुवात…..

मागील काही दिवसांपासून सततच्या पावसाचा सोयाबीन पिकावर विपरित परिणाम झाला त्यात प्रामुख्याने सोयाबीन पिवळे पडणे व वाढ थांबणे ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पिकातील समस्या सोडवण्यासाठी आज रिलायन्स फाऊंडेशन व संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड यांच्या मदतीने डायल आऊट कॉलचे आयोजन करण्यात आले. त्यात कृषी विज्ञान केंद्र सगरोळी चे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सोयाबीन पिकाची खुंटलेली वाढ आणि पिवळसरपणा यावर उपायोजना दिल्या यासाठी शेतकऱ्यांनी फेरस सल्फेट 50 ग्रॅम प्रति किंवा चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 50 ग्रॅम किंवा 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी आणि शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे असे सूचित केले. सोयाबीन पिकातील कीड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी 50 टक्के शिफारशीत कीटकनाश काच्या मात्रे सोबत 5% टक्के निंबोळी अर्काची फवारणी, फेरोमोन सापळे 5-10 प्रति एकर, पक्षी थांबे 20-25 प्रति एकर, पिका भोवती सापळा पीक म्हणून झेंडू, मका, चवळी यासारख्या पिकाचा वापर करावा असे सांगितले. या एकूण 52 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. #farm​​ #farmer #agriculture​​ #kvk​​ #sagroli​​ #nanded #agri #agritech #agricultureworld #AzadiKaAmritMahotsav #शेतकरी #शेत #शेती #ClimateChange #climate_smart_agriculture #call @reliancefoundation

Comments are closed.