केळी विक्री करून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा त्याचे मूल्यवर्धित पदार्थ करून जर विक्री केली तर अधिक नफा कमवू शकतो ही गोष्ट येथील महिलांना पटलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तेथील उमेद अभियाना च्या महिला बचत गटा हे ॲक्टिवआहेत. केळी विक्री करून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा त्याचे मूल्यवर्धित पदार्थ करून जर विक्री केली तर अधिक नफा कमवू शकतो ही गोष्ट येथील महिलांना पटलेली आहे. परंतु कोणताही उद्योग करायचा तर त्याला शास्त्रशुद्ध आणि तांत्रिक प्रशिक्षणाची गरज असते. म्हणूनच अर्धापूर तालुक्यातील लहान, मालेगाव, दाभड, अर्धापूर, नांदला दिग्रस, उमरी, पाटणूर आणि येळेगाव गावांमधील महिला साठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आज दिनांक 19/4/2022 रोजी केळी पासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे हे प्रशिक्षण आयोजित केले गेले. या प्रशिक्षणामध्ये केळीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व त्याचे विविध मूल्यवर्धित पदार्थ जसे चिप्स लोणचे पावडर सुकेळी यांची सखोल माहिती देऊन प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले. तसेच उद्योगाला लागणारे परवाने, प्रकल्प अहवाल तयार करणे, पदार्थांची पॅकेजिंग आणि ब्रँडिंग या विषयांची देखील माहिती महिलांना देण्यात आली. सदरील प्रशिक्षणासाठी अर्धापूर तालुक्याचे उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री लोहकरे सर देखील उपस्थित होते. #women#Empowerment#kvk#sagroli#nanded#Bananas#bananabread#bananaeatchallenge#Bananas#processingequipment#processingtime#processingorders#ruraldevelopment#rurallife#rural#UMED#Abhiyan#केळी_बाग#केळीबागायतदार#उमेद#valueaddition#अभिया#SHG#महिला_बचतगट_व_महिला_उद्योजकांच्या#महिला_बचत_गट#पॅकेजिंग#ब्रँडिंग