सहसा दुर्लक्षित असणारी, कोरड्या व उष्ण हवामानात, माळरान, डोंगर उतार कोठेही सहज उगवणारी वनस्पती म्हणजे कोरफड. ही दुर्लक्षित वनस्पती औषधी गुणधर्मांचा खजाना आहे. म्हणूनच अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनंमध्ये हीचा वापर केला जातो. कोडफडीची प्रक्रिया करून साबण, शाम्पू, तेल, जेल असे अनेक प्रकारची प्रसाधने तयार सहज केली जाऊ शकतात. महिला बचत गटांसाठी गृह उद्योगाची एक चांगली सुरुवात यातून होवू शकते. म्हणूनच १० दिवसांचे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या गृह विज्ञान विभागामार्फत कोरफडी पासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित केले गेले. या प्रशिक्षणात कोरफड काढणी, त्याचा अर्क निर्मिती आणि त्यापासून साबण, शाम्पू, जेल, तेल असे विविध प्रकारचे उत्पादनांची प्रत्यक्ष प्रक्रिया करून दाखवण्यात आली. धर्माबाद आणि बिलोली तालुक्यातील उमेद अभियानातील बचत गटांच्या महिलांचा आणि युवकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद या कार्यक्रमास होता. #women #womenempowement #WomensDay2022 #womeninbusiness #womensupportingwomen #womenempoweringwomen #ruralwomenempowerment #trainingday #trainingcenter #trainingsession #कोरड्या #आयुर्वेदिक #औषधांमुळे #सौंदर्य #कोरफड #ALOEsoap #aloescrub #aloeswood #aloeskincare