उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल…..
March 23, 2022
रसायन मुक्त होळी – काळाची गरज…
March 24, 2022

कौशल्य विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान अंतर्गत “उन्हाळी भुईमूग लागवड घुगे पॅटर्न ” पेरणीपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिकातिल शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवठा

संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि नांदेड कडून राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान 2021-22 अंतर्गत मौजे अंबुलगा तालुका मुखेड येथे “समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक” उन्हाळी भुईमूग राबविण्यात येत आहे. हे प्रात्यक्षिक कृषिभूषण श्री मधुकर घुगे केहाळ तालुका जिंतूर विकसित” घुगे पॅटर्न “वर आधारित आहे. मागील तीन वर्षापासून उन्हाळी भुईमूग प्रात्यक्षिकांमध्ये घुगे पॅटर्नचा अवलंब केल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकतेमध्ये वाढ दिसून आली त्यामुळे या हंगामामध्ये मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा येथील 25 शेतकऱ्यांची 10 हेक्टर प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आली व त्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा( सुधारित वाण टॅग 37, ट्रायकोडर्मा, एनपीके व फॉस्फो जिप्सम ,जमीन आरोग्य पत्रिका, घुगे पॅटर्न माहितीपुस्तिका) करण्यात आला .कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व श्री तुकाराम मंत्रे यांनी शेतकऱ्यांना “घुगे पॅटर्न “विषयी प्रशिक्षित केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुखेड तालुका कृषी अधिकारी श्री बिराडे, तालुका तंत्र व्यवस्थापक श्री जायभाये, कृषी सहाय्यक श्री गिरी व गावातील 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग होता. #summer #CropProtection #Cropsafety #crop #cropscience #CropSolutions #skill #कौशल्य #विकास #राष्ट्रीय #तेलबिया #पिके #अभियान #उन्हाळी #भुईमूग #लागवड #घुगे #पॅटर्न #प्रशिक्षण #प्रात्यक्षिक #निविष्ठा #peanuts #oil #National #Mission on #Oilseeds #OilPalm #edibleoil #kvk #Sagroli

Comments are closed.