खरीप हंगामात जाणवणारा बियाण्यांचा तुटवटा आणि बाजारात मिळणाऱ्या महाग बियाण्यांची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ऊन्हाळी सोयाबीन या पिकाला प्राधान्य दिले.
ऊन्हाळी सोयाबीन पिकामध्ये विविध किड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. ऊन्हाळी हंगामात प्रामुख्याने रसशोषक किडी आणि त्यामार्फत पसरणारे रोग यांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो त्या अनुषंगाने संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत मौजे बेळकोणी ता. बिलोली जि. नांदेड येथे “ऊन्हाळी सोयाबीन पिकातील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन” या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी डॉ. कृष्णा अंभुरे यांनी सोयाबीन पिकातील विविध किड व रोगांची ओळख आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन जसे की, निंबोळी अर्काचा वापर, कामगंध सापळ्यांच वापर विविध जैविक कीटकनाशके आणि रासायनिक कीटकनाशके याविषयी सखोल मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसण केले. प्रशिक्षणाला बेलकोणी गावातील 29 महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. #kvk#Nanded#sagroli#सोयाबीन_#सोयाबीनसल्ला#रसशोषक#रसशोषककीड#रसशोषककिडी#किड#रोग#व्यवस्थापन#ऊन्हाळी#सोयाबीन_बिजोत्पादन#निबोळीअर्क#soybean#farmer#farming#pest#disease#management