तेजस्विनी च्या माध्यमातून ग्रामीण महिला लघु उद्योजक व्हाव्यात : कृषि विज्ञान केद्र सगरोळी च्या तेजस्विनी गारमेंट सेंटर (C.F.C.) चे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
July 3, 2021
सगरोळीच्या तेजस्विनी बनल्या आत्मनिर्भर : लॉकडाऊन काळात किरकोळ कामापासून सुरु झालेल्या प्रवासाचा लाखाचा पल्ला पार
September 16, 2021

गंगामा मंडळ या पोषण बागेची आखणी डॉ. माधुरी रेवणवार यांनी महिलांना प्रत्यक्ष करून दाखविली

दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्व खूप जास्त आहे. बऱ्याच वेळा बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा असतो. अथवा असलेल्या भाज्यांचे भाव खूप जास्त असतात. अशा वेळी सगळ्यांनाच भरपूर भाज्या खरेदी करणे शक्य नाही. म्हणूनच प्रत्तेकाच्या दारी जागेच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याची परसबाग असावी. जेणेकरून भाजीपाल्याची कमतरता पडणार नाही. दिलेल्या शिफारसिपेक्षा भाजीपाल्याची दैनंदिन आहारात कमतरता पडल्यास जीवनसत्वे आणि खनिजांच्या अभावामुळे विविध आजार जडतात. जसे कि अ जीवनसत्वाच्या अभावामुळे डोळ्यांचे विकार, क जीवनसत्वाच्या अभावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच त्वचेचे आणि हाडांचे आजार होतात. त्याच प्रमाणे लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो. निरोगी जीवनासाठी भाजीपाल्याची अत्यंत गरज प्रत्तेकालाच आहे. भाजीपाल्यांमध्ये सूक्ष्म पोषकतत्वे असतात म्हणजे सर्व प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे विशेष करून लोह आणि काल्शियाम जे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे आणि रक्तक्षय तसेच हाडांचे आजार कमी करण्यासाठी आवश्यक आहेत. भाजीपाल्यांमधील जीवनसत्वे आणि खनिजांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.  म्हणूनच ग्रामीण भागातील पोषणा अभावी होणाऱ्या समस्या कमी करण्याच्या हेतूने आणि महिलांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान विभाग कडून नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, कंधार भाग मध्ये पोषण पारस बागेचे प्रशिक्षण व प्रात्याक्षिके दि. ६/७/२०२१, ९/७/२०२१, १९/७/२०२१ रोजी देण्यात आल्या. प्रामुख्याने गोल आकाराची गंगामा मंडळ मॉडेल सर्वांना करून दाखविण्यात आले. त्या सोबतच १६ प्रकारच्या विविध भाज्यांचे बियाणे, 3 प्रकारची भाजीचे रोपे आणि एक फळाचे रोप असा संच २०० महिलांना प्रत्तेकी एक संच या प्रमाणे प्रात्यक्षिकासाठी देण्यात आली.

  

Comments are closed.