गरीब कल्याण संमेलन व खरीप शेतकरी मेळाव्यास सगरोळी येथे हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती….!
केंद्र शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचाव्यात किंबहुना त्याचा किती लाभ होत आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच खरीप पूर्व पिकांचे लागवड तंत्रज्ञान प्रसारासाठी मंगळवार ,दि.३१ मे 2022 रोजी संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड येथे गरीब कल्याण सम्मेलन व खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .ह्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी मा.पंतप्रधानांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे योजना लाभार्थ्यांशी व उपस्थित शेतकऱ्यांची संवाद साधला.या कार्यक्रमाचे प्रसारण व आयोजन संस्कृती संवर्धन मंडळ कृषि विज्ञान सगरोळी जि नांदेड तर्फे करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी 16 योजनांची मागील 8 वर्षातील आढावा मा. पंतप्रधानांनी देशासमोर मांडला व आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी योजनांची भूमिका विशद केली. व्हिडिओ काॅन्फरन्सिंग संवादानंतर शिवस्पर्श शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री.रतन गिरी यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे शेतीतील विविध प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांना दिली. तर कृषी विज्ञान केंद्राचे पिक शास्त्रज्ञ प्रा.कपिल इंगळे यांनी खरिप हंगामातील सोयाबीन उत्पादन वाढीचे तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना अवगत केले व पीक संरक्षण तज्ञ डाॅ.कृष्णा अंभुरे यांनी खरिप पिकातील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन श्री.प्रमोद देशमुख हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सौ .पुनमताई राजेश पवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री.लक्ष्मणराव ठक्करवाड , गणेश पाटील मरखले ,आबाराव संगणोर, चंद्रशेखर सावळीकर, श्री सुनील देशमुख व सगरोळीच्या सरपंच सौ.रुपालीताई शेळके उपस्थित होते.
या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील १२०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.