रब्बी पिकांच्या एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण…
December 12, 2022
भाजीपाल पिकामध्ये चांगली प्रतीचे आणि जास्त उत्पन्न मिळण्यासाठी शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर करणे गरजेचे….
December 12, 2022

गावाचा व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक गावाने पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे….

जलशक्ती मंत्रायल अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, केंद्रशासन, राज्यशासन, भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि कृषी विज्ञान केन्द्र यांच्या पुढाकाराने देशभरात जलशक्ती अभियान – Catch the Rain, Where it falls when it falls या विषयावर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण शेतकरी वर्गामध्ये पाणलोट विकासाचे महत्व, पाण्याचा ताळेबंद, पाण्याचा योग्य वापर आणि त्यासोबतच पाण्याचा शेतीमध्ये वापर, रब्बी पीक नियोजन आणि एकात्मिक कीड व रोग नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन व जागरुकता यावी या साठी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी काटकळंबा ता. कंधार येथे शेतकरी मेळावा आयोजित केला. संस्कृति संवर्धन मंडळ, सगरोळी या संस्थेने काटकळंबा हे गाव पाणलोट विकासासाठी निवडले असून येथे नाबर्ड आणि Atlas Copco यांच्या अर्थ साहाय्यतुन संस्थेने अनेक कामे केली आहेत. तसेच बरीच कामे नियोजित आहेत. पाणलोट आणि त्यामुळे झालेला शेती पद्धतीमध्ये बदल, गावकऱ्यांचा एकुण फायदा, महीला सक्षमीकरण, उद्योग वाढ, एकूणच सामाजिक, आर्थिक आणि शेती बदल याच कामांची दखल घेवुन एस पी जैन, मुंबई यांनी संस्थेला सोशल इमपॅक्ट अवॉर्ड या बहुमूल्य अवॉर्डने सन्मानित केले आहे. या मेळाव्या मध्ये संस्थेच्या वतीने काटकळंबा गावातील पाणलोट समिती व गावकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. #जलशक्ती #जलशक्तीअभियान2022 #kvksagroli #nanded #पाणलोट #विकास #हवामान_बदल #शेतकरी #मेळावा #Atlas_Copco #JalShakti #JalShaktiAbhiyan #jalshakti4jalshakti #जलजीवनमिशन #नाबर्ड #NABARD Atlas Copco @atlascopcogroup #SPJIMR #mumbai
 

Comments are closed.