या कृषि संमेलनासाठी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी कडून प्रतिनिधी म्हणून नांदेड जिल्ह्यातून 5 (वेगळ्या क्षेत्रातील कृषि, फळबाग व भाजीपाला, FPO आणि गोपालक) शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या दोन दिवसीय संमेलनात 600 ॲग्रिकल्चर स्टार्टअप कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता ज्या की नवनविन संकल्पना घेऊन आज कृषि क्षेत्रात यशस्वी पणे काम करत आहेत. त्या मधील एक बीजॅक नावाची स्टार्टअप जे शेतकऱ्यांना आपण पिकवलेल्या मालाला योग्य तो भाव मिळावा यासाठी व्यापारी आणि शेतकरी यांच्या मधील दुवा म्हणून एका मोबाईल ॲप द्वारे काम करत आहे. त्या मधील दुसरी स्टार्टअप कंपनी GREEN JAMS आहे जी की शेतामधील विविध पिकांच्या अवशेषांपासून जे की जाळण्यात येत होते त्या पासून घर बांधकामासाठी लागणारे विट बनवतात कमी शब्दात सांगायचं झालं तर Waste To Wealth म्हणून काम करते.