ग्रामीण विकासासाठी “वातावरण बदलास अनुकूल समाज निर्माण” : संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व रिलायन्स फाउंडेशन इंडिया यांचा संयुक्त उपक्रम
संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी व रिलायन्स फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “वातावरण बदलास अनुकूल समाज निर्माण करण्याच्या” उद्देशाने बिलोली, नायगाव व मुखेड तालुक्यातील सर्व गावांमधे ५ वर्ष कालावधीसाठी हा प्रकल्प राबविला जाणार असून पहिल्या वर्षी 30 गावांमध्ये या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.
या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे बदलत्या वातावरणाचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्राम विकासासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहीत करणे तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि बचत गट यांना उद्योग निर्मितीसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.
या संदर्भातील सामंजस्य करार करण्यासाठी दि.२२ ऑगस्ट रोजी रिलायन्स फाउंडेशन चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक श्री.राम कृष्ण,, श्री नितीन शर्मा, राज्य प्रकल्प व्यवस्थापक व त्यांची नांदेड ची टीम, संस्थेचे संचालक श्री.रोहित देशमुख, वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.सुरेश कुलकर्णी व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख प्रा.वेंकट शिंदे उपस्थित होते.