उमेद नांदेड जिल्हा वर्धिनीं ची एक दिवसीय निवासी कार्यशाळा उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न.
December 7, 2021
मृदा संवर्धन काळाची गरज – श्री.रविशंकर चलवदे.
December 7, 2021
जमिनीचे आरोग्य व माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, रब्बी पीक संरक्षण, उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जागतिक मृदा दिनानिमित्य दि.5 डिसेंबर रोजी संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी शेतकरी मेळावा व जमीन आरोग्य पत्रिका वितरण समारंभ मौजे कराळ तालुका बिलोली येथे ठेवण्यात आला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य व माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, रब्बी पीक संरक्षण, उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध कृषी विभागाच्या योजना इत्यादी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे चे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे ,डॉ. कृष्णा अंभोरे, आत्मा बिलोली चे तालुका तंत्र व्यवस्थापक श्री कांबळे व समूह सहाय्यक श्री मधुकर चिंगळे श्री दिवडे ,शेतीशाळा प्रशिक्षक माधव शेळके, शिवशंकर कनशेटे, इत्यादींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात 20 शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. #kvk #sagroli #nanded #KrushiVed #agriculture​​ #farm​​ #कृषिवेद #farmers #soil #crop #WorldSoilDay #AzadiKaAmritMahotsav

Comments are closed.