समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक सोयाबीन अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा…
July 12, 2022
शहापूर येथे “सोयाबीन पिक परिसंवाद” संपन्न…
July 12, 2022

ट्रॅक्टर चलित सबसाॅइलर चे प्रात्यक्षिक व नाविन्यपुर्ण शेती यांत्रिकीकरणाची सखोल माहितीव्हावी यासाठी भाडे तत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्र (CHC) चालकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते ….

याप्रशिक्षणा मध्ये शेती यांत्रिकीकरण व नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाची सखोल माहिती देऊन ट्रॅक्टर चलित सबसाॅइलर चे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले. प्रक्षेञ भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या भाडे तत्वावरील कृषि अवजारे सेवा केंद्रास (CHC) भेट देऊन उपलब्ध असलेल्या अवजारांबद्दल माहित देण्यात आली. रुंद सरी वरंबा टोकण यंत्र (BBF Planter) ची हाताळणी संबंधी रोहीत अॅग्रो इंडस्ट्रीज चे श्री.पराक्रम टोम्पे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या बरोबरच प्रशिक्षणामध्ये किफयातशीर, नाविन्यपूर्ण आणि प्रगत कृषि यंत्रची कृषि अभियांत्रिकी विभागाच्या विषय विशेषज्ञ डाॅ.प्रियंका खोले यांनी सखोल माहिती व मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा ४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे दि.०६ व ०७ जुन रोजी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, कृषि विभाग आत्मा अंतर्गत भाडे तत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्र (CHC) चालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न. #inovative #agritech #machinery #chc #custom #hiring #agrimachinery #center #youth #fpo #youthdevelopment #skilling #skill #skills #agriculture #agricultureworld #agriskills #agribusiness #entrepreneur #entrepreneurship #agrientrepreneur #ruralyouth #employment #employmentopportunities #employmentopportunity #unemployment #selfemployment #agri

Comments are closed.