डोंगरगाव ता. मुखेड येथे किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न…
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मुखेड व संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरगाव तालुका मुखेड येथे “उन्हाळी भुईमूग व सोयाबीन बीजोत्पादन उत्पादकता वाढीसाठी” किसान गोष्टी कार्यक्रम घेण्यात आला. या उन्हाळी हंगामामध्ये डोंगरगाव तालुका मुखेड येथे मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमूग व बीजोत्पादनासाठी सोयाबीन लागवड झालेली आहे, परंतु कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी चे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व कृषी विभाग मुखेडचे कृषी पर्यवेक्षक श्री घुगे व तालुका तंत्र व्यवस्थापक श्री जायभाये यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने उन्हाळी पिकातील कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कृषी विभाग विभागाच्या विविध योजना, कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान, शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी गावातील महिला शेतकरी व युवा शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. #farmer#farmersmarket#farmerschallenge#agri#youthempowerment#youth2030#आत्मा#उन्हाळी#भुईमूग#भुईमूग_पिक#भुईमूग_शेती#भुईमूगाच्या_शेंगा ##भुईमुग#सोयाबीन_#सोयाबीन#सोयाबीन_काढणी#सोयाबीन_बिजोत्पादन#पिकातील#कीड#योजनाओं#रोग#व्यवस्थापन#kvk#sagroli#nanded