टाळेबंदी व उद्योगाच्या संधी : कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व उमेद अभियान (ता.उमरी) तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न
June 10, 2021
गंगामा मंडळ या पोषण बागेची आखणी डॉ. माधुरी रेवणवार यांनी महिलांना प्रत्यक्ष करून दाखविली
August 12, 2021

तेजस्विनी च्या माध्यमातून ग्रामीण महिला लघु उद्योजक व्हाव्यात : कृषि विज्ञान केद्र सगरोळी च्या तेजस्विनी गारमेंट सेंटर (C.F.C.) चे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

महिला बचत गटामार्फत मिळणाऱ्या संधीने प्रत्येक महिलाने आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आर्थिक प्रगती करावी. काळाची गरज ओळखून असा व्यवसाय निवडावा कि त्यात गटाच्या मार्फत सर्वांचे व्यक्तिगत तथा सामाजिक हित व्हावे असे मत नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर यांनी मांडले. ते आज मानव विकास मिशन अंतर्गत महिला विकास महामंडळ यांच्या २०१९-२० निधीद्वारे कृषि विज्ञान केंद्र संचालित तेजस्विनी गारमेंट सेंटर (Common Facility Centre) च्या उद्घाटनप्रसंगी सगरोळी येथे बोलत होते. त्यांच्या सोबत जिल्हा नियोजन अधिकारी श्री. थोरात व जिल्हा समन्वय अधिकारी, मविम श्री. चंदनसिंग राठोड ही उपस्थित होते.
सगरोळी येथील CFC मध्ये २२ इलेक्ट्रिक शिलाई मशीन, ४ ओव्हर लॉक मशीन, काच बटन मशीन शिवाय कटिंग व स्किन प्रिंटींग मशीन हि ठेवण्यात आली आहे. यात गावातील शिवणकाम येणाऱ्या ३० महिलांकडून मास्क, शालेय गणवेश, कापडी पिशव्या, शेतकरी महिलांसाठी कष्ट कमी करणारे कापूस वेचणी कोट, सोयाबीन वेचणी हातमोजे, सनकोट, अप्रोन, रजई आदी करून त्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील असे CFC च्या अध्यक्षा सौ. शांता हराळे यांनी सांगितले.
मविमं चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. चंदनसिंग राठोड यांनी मंडळामार्फत ग्रामीण महिला स्वावलंबी होत असून या डीजीटल काळात आर्थिक व्यवहारही करत आहेत. हाताला काम तर कामाला योग्य दाम याचे व्यवस्थापन बचत गटामार्फत केले जाते. त्यामुळे महिला जास्त संख्येने यात सहभागी असतात असे विचार मांडले.
महिलांनी नुसतेच काम न करता त्यापूर्वी आर्थिक साक्षर व्हावे तरच कष्टाचे फळ मिळेल. म्हणून सगरोळी च्या बचत गटातील महिलांना म.वि. मं. कडून शिलाई मशीन सोबतच आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण मिळावे असे मत संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन श्री. प्रमोद देशमुख यांनी समारोप प्रसंगी मांडले.
जिल्हाधिकारी व तर पदाधिकारी यांनी संस्थाकार्यांची जवळून माहिती घेतली. कृषि विज्ञान केंद्र कडून चालणारे विविध उपक्रम व विस्तीर्ण असे १.५ कोटी लिटर साठवणुकीचे शेततळे आणि गतवर्षी लागवड केलेले बांबू प्रात्यक्षिक प्रक्षेत्रास भेट दिली आणि समाधान व्यक्त केले. #आत्मनिर्भरभारत #ग्रामीण_महिला_लघु_उद्योजक #womenempowerment #KVK #Sagroli #Nanded #Tailoring 
 

Comments are closed.