धान्यातील कीड नियंत्रण ही एक महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. वातावरण बदलले आणि धान्यातील ओलावा वाढला की कीड सुरू होते अणि अश्या कीड लागलेल्या धान्याची साफ सफाई करणे महिलांसाठी किचकट काम होते. त्यासोबतच धान्याचे देखील नुकसान होतें. हे नुकसान टाळण्यासाठी अणि कीड नियंत्रणाच्या उद्देशाने बरबडा ता. नायगाव येथे पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया विकसीत कीड नियंत्रक बॅग ज्याला ग्रेन प्रो बॅग असे म्हणतात आणि तामिळनाडू कृषी विद्यापीठ विकसीत कीड पकडण्याचे सापळे ज्याला इंसेक्ट प्रोब ट्रॅप म्हणतात या दोन्हींचे प्रात्यक्षिक संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत महिलांना देण्यात आले. #grain#insects#trapped#grain_pro_bag#household#pestcontrol#insect_trap#PCI#TNAU#agri#धान्यातील#कीड#नियंत्रण#शेतकरी_brand#शेतकरी_महिला#grain_losses