शेळीपालन व्यवसाय: महिला बचत गटाला एक संधी..
January 23, 2023
यांत्रिकीकरणा चे महत्व व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन या विषयावर एक दिवसाचे प्रशिक्षणा चे काटकळंबा येथे आयोजन…..
May 12, 2023

धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त भव्य किसान संमेलनाचे आयोजन……

मागील पाच महिन्यांपासून रिलायन्स फाउंडेशन आणि संकृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी एकत्रितपणे वातावरण अनुकूल समाज विकास (Building Climate Resilient Community) हा प्रकल्प बिलोली आणि नायगाव तालुक्यातील 50 गावांमध्ये राबवित आहे. यामध्ये आज पर्यंत 2700 ग्रामीण कुटुंब विकासाच्या कार्यक्रमासाठी जोडली गेली आहेत. यामध्ये नवनवीन पीक प्रात्यक्षिक, पिकांची उत्पादन वाढ, उद्योजकता विकास, आहार आणि आरोग्य या विषयांवर विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 28 डिसेंबर 2022 रोजी किसान संमेलनाचे आयोजन डोणगाव खुर्द तालुका बिलोली येथे करण्यात आले. सदरील किसान संमेलन गावातील शिवलिंग बादशा या शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) ने पुढाकार घेऊन पूर्ण आयोजन आणि व्यवस्थापन केले. या कार्यक्रमांमध्ये सं.सं.मं.सगरोळी प्रकल्प संचालक श्री. रोहित देशमुख, इफको कंपनीचे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक डॉ. पोवार, व जिल्हा व्यवस्थापक श्री. घाटगे, रिलायन्स फाउंडेशन चे नांदेड जिल्हा व्यवस्थापक श्री. योगेश जोशी, श्री. नासिर अली श्री. गणेश, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. माधुरी रेवनवार, डॉ. कृष्णा अंभुरे, श्री. माधव ताटे हे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती, उद्योजकता विकास, आहार आणि आरोग्य अशा अनेक विषयांवर ती मार्गदर्शन करण्यात आले. बिलोली, नायगाव, उमरी या तालुक्यांमधील अनेक गावांमधून शेतकरी व बचत गटांच्या सदस्य महिला उपस्थित होत्या. शेतकरी तसेच बचत गटांच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे स्वतःचे मनोगत व्यक्त केले. तसेच विविध बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडुन विविध शेती उपयोगी अवजारे प्रक्रिया पदार्थ सेंद्रिय भाजीपाला यांचे प्रदर्शन या प्रसंगी भरवण्यात आले. 800 हून अधिक शेतकरी व बचत गटांच्या महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग, उमेद अभियान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. #farms #soil #हवामान_अंदाज #water #farmer #farming #agriculture #kvksagroli #krushived #climatechange #climatefriendly #हवामान_अंदाज #farmingpractices #Building #Climate #Resilient #Community 

 

 

Comments are closed.