उन्हाळी हंगामात भात शेतीला पर्याय म्हणून “उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन” यासंदर्भात 50 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले…..
December 7, 2021

नागठाणा तालुका उमरी येथे लिंबू तोडणी यंत्राचा शेती दिन साजरा…

पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी पडलेले लिंबू जमा करून धुवून घेतात आणि नंतर  पोत्यांमध्ये भरून विक्रीस पाठवतात.  यामध्ये झाडावरून पडल्यामुळे लिंब खराब होणे लिंबाला डाग पडणे होते. जवळपास 20 टक्के नुकसान या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना सहन करावे लागते. लिंबाचे हे नुकसान टाळण्यासाठी आणि स्वच्छ आणि योग्य लिंबू तोडण्यासाठी आय आय आर बेंगलोर यांनी लिंबू तोडणी यंत्राची निर्मिती केली आहे. या लिंबू तोडणी यंत्राच्या सहाय्याने लिंबू तोडल्यामुळे लिंबू स्वच्छ राहतात तसेच तोडणी यंत्रात जमा झाल्यामुळे त्याचे कुठलेही नुकसान होत नाही. या यंत्राचे प्रात्यक्षिक तसेच शेती दिन नागठाणा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी गृहविज्ञान विभागातर्फे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी एकूण 27 शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना लिंबू तोडण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच सविस्तर मार्गदर्शन देखील करण्यात आले.

 

Comments are closed.