यांत्रिकीकरणा चे महत्व व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन या विषयावर एक दिवसाचे प्रशिक्षणा चे काटकळंबा येथे आयोजन…..
May 12, 2023
नर्चर फार्म (नीव फाउंडेशन) व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी क्षेत्रात विम्याचे महत्त्व
May 12, 2023

नाडेप खत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत हे कशाप्रकारे करायचे यावर एक दिवसीय प्रात्यक्षिकाचे आयोजन..

संस्कृती सवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सलेट जनरल, मुंबई यांच्या संयुक्त विदयमानाने पिकांच्या अवशेषांचा कंपोस्टिंग साठी वापर या विषयावर एक दिवसीय प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले होते. पिकांचे अवशेष जाळल्यामुळे मानवी जीवनावर, जमिनीवर, आणि निसर्गावर वाईट परिणाम होतो. आपल्या भागामध्ये उसाची पाचट, गव्हाचा भुसा, आणि कापसाच्या पराठ्या फार मोठ्या प्रमाणामध्ये जाळल्या जातात ते न जाळता त्याला कुजून चांगल्या प्रकारे कंपोस्ट खत तयार होऊ शकतो असे प्रा. कपिल इंगळे यांनी प्रात्यक्षिक मध्ये सांगितले गेले.
नाडेप खत निर्मिती पद्धत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत हे कशाप्रकारे करायचे हे सांगण्यात आले.गांडूळ खत निर्मिती साठी कोणते साहित्य लागते जसे की भुसा, माती, बारीक केलेले शेतातली पिकांचे अवशेष,गांडूळ आणि शेण व गांडूळ खता मध्ये मुख्य अन्नद्रव्य नत्र-0.5 ते 1.50%, स्फुरद-0.1 ते 0.30%, पालाश-0.15 ते 0.56% हे आपल्याला भेटते याची माहिती देण्यात आली. तसेच नाडेप खत निर्मिती पद्धत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. #USConsulate #climatechangeaction #stubbleburning #USConsulateGeneral #mumbai #support #kvksagroli #nanded #farmers #trainingday #climatechange #friendly #agricultureandfarming U.S. Consulate General Mumbai @usconsulategeneralmumbai Sanskriti Samvardhan Mandal
 
 

Comments are closed.