Financial Literacy Program in coordination with DRISHTI..
October 30, 2021
प्राण्यांच्या भल्यासाठी सेवा करणे हे नोबेल कार्य आहे आणि आजची मोहीम त्या दिशेने एक पाऊल आहे – डॉ. तामलूरकर
October 30, 2021
“परसबागेतील कुक्कुटपालन करा आणि घराला आर्थिक हातभार लावा”
शेती आणि वातावरण यांच्यातील विषमतेमुळे शेतकरी, शेतीच्या उत्पादनात उत्पन्नामध्ये सतत तडजोड करताना दिसत आहे. या काळात आर्थिक स्थैर्य राखण्यात शेतकऱ्याला अडचणी येत आहेत. याच्यातून पर्याय म्हणून शेतीपूरक व्यवसाय करणे हा उत्तम मार्ग आहे. याच जोडधंदा पैकी कुक्कुटपालन हा एक महत्वाचा जोडधंदा आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन केदारवडगाव व लाट ( खु). ता. नायगाव, येथील पाणलोट समित्यांनी ‘परसबागेतील कुक्कुटपालन’ व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले आणि दिनांक ७/१०/२०२१ रोजी जागतिक अंडी दिनाचे औचित्य साधून या दोन्ही गावांमध्ये परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यानंतर पाणलोट समितीमार्फत निवडलेल्या शेतकऱ्यांना कावेरी जातीच्या गावरान कुक्कुटपक्ष्यांचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. निहाल मुल्ला, विषय विशेषज्ञ- पशुवैद्यक शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्याकडून कुक्कुटपक्ष्यांचे व्यवस्थापन, खाद्य तयार करण्याची पद्धत, लक्षणांवरून आजार ओळख व लसीकरण इत्यादी गोष्टींची माहिती देण्यात आली, या सोबतच आर्थिक ताळेबंद मांडताना या कुक्कुटपालनातून आर्थिक उत्पन्नाबद्दल चर्चा केली. कावेरी जातीचे पक्षी गावरान पक्षांप्रमाणेच खाकी रंगाचे व मोठ्या आकाराचे अंडे देतात. यांच्यापासून वर्षाला १५० ते १८० अंडी मिळू शकतात. सरासरी गावरान अंडी रुपये पंधरा ते वीस च्या दरम्यान विकली जातात. याच आधारे एका कोंबडी कडून सुमारे दोन हजार ते तीन हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. या अतिरिक्त उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट या महत्त्वाकांक्षी योजनेला हातभार लावू शकतो. घरातील लहान मुले आणि महिला करिता पोषण आहाराचा भाग म्हणून यांच्यापासून मिळालेली अंडी फायदेशीर आणि कमी किमतीत शेतकऱ्याच्या घरीच उपलब्ध होऊ शकतात आणि चांगल्या प्रतीचे प्रथिने आहारात येतात. तसेच कावेरी पक्षांमध्ये चांगली रोगप्रतिकार क्षमता असते म्हणून यांच्यात आजाराचे प्रमाण कमी असते म्हणूनच असे पक्षी पाळावेत असे आवाहन डॉ. निहाल यांनी याप्रसंगी केले तसेच शिकारी प्राण्यांपासून आपले पक्षी सांभाळून ठेवण्याची सावधानता बाळगण्याचेही देखील आवाहन केले.
याप्रसंगी श्री. लष्करे, गावचे माझी सरपंच आणि पाणलोट समितीचे अध्यक्ष व निवडलेले ग्रामस्थ उपस्थित होते. #kvk #sagroli #Nanded #KVKSagroli #BackyardPoultry #Kavrei #BrownShellEgg #Economics #Farmer #FreeFromMalnutrition #PoultryFeed #Trainingday #Traiining

Comments are closed.