सावित्रीच्या लेकींचा सत्कार…..
January 13, 2022
उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल…..
March 23, 2022

पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीचा हात धरल्यास यश नक्की मिळतं- श्री.ज्ञानेश्वर बोडखे

कृषि विभाग आत्मा नांदेड यांच्या सहकार्यातून कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिनव फार्मस क्लब पुणे चे प्रवर्तक श्री.ज्ञानेश्वर बोडखे व जलसाक्षरता केंद्र यशदा चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक श्री.सुमंत पांडे हे होते. आपल्या मनोगतात श्री.बोडखे यांनी शेतकय्रांना कृषि विज्ञान केंद्राच्या सहकार्यातून सेंद्रिय शेतीवर भर द्यावा विषमुक्त शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीकडे वळण्यासंबंधी आवाहन केले. श्री.सुमंत पांडे यांनी ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर ही चिंतेची बाब आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,गावातले पाणी गावात व गावातला माणूस गावात राहीला पाहिजे या तत्वावर कामे करण्याबरोबरच पारंपारिक पिके,दुर्लक्षित कडधान्य,गळीऔधान्य यांच्या संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्याबाबत आवाहन केले. या संवाद कार्यक्रमास एस.बी.आय.चे जिल्हा व्यवस्थापक (कृषि) श्री.किरण चांदोरकर,संस्कृति संवर्धन मंडळाचे संचालक श्री.सुनील देशमुख,कार्यकारी संचालक श्री.रोहीत देशमुख व जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांची उपस्थिती होती. #ज्ञानेश्वर #बोडके #kvk #sagroli #nanded #शेती #Abhinav #Club #vegetables #Dnyaneshwar #bodke #visit #vegetable #KrushiVed #farm​​ #कृषिवेद #farmer #youth #rural #youthdevelopment #skilling #skill #agriculture #agricultureworld #agriskills #agribusiness #entrepreneur #agrientrepreneur #ruralyouth
 

Comments are closed.