राजमा लागवडीतून रब्बी हंगामात पिक बदल शक्य
November 4, 2022
सोयाबीन कापणी सोपी करण्यासाठी सोयाबीन कापणी हातमोजेचा प्रभावी वापर….
November 4, 2022

 पोषण बागेच्या माध्यमातून अन्नसुरक्षा….

अन्न पोषण सुरक्षा ही सध्याची महत्त्वाची गरज आहे. ग्रामीण भाग हा अन्न पिकवतो परंतु अन्न आणि पोषक तत्वांचा अभाव हा ग्रामीण भागात विशेषतः महिलांमध्ये दिसुन येतो. महिलांमध्ये लोह आणि कॅल्शियमच्या अभावामुळे रक्तक्षय व हाडांचे त्रास जास्त आढळतात. म्हणुनच जागतिक अन्न दिवसाच्या निमीत्ताने संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत विवीध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज दि. 13/10/2022 रोजी KVK, संस्थेचा क्लायमेट चेंज अडोपशन CCA आणि धान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घोडज ता. कंधार येथे अन्न व पोषण विषयी मार्गदर्शन आणि भाजीपाला पोषण बागेचे प्रात्यक्षिक देन्यात आले. डॉ . माधुरी रेवणवार यांनी अन्न व पोषण यावर मार्गदर्शन केले व पोषण बाग प्रात्यक्षिक दाखविले तर प्रा. वेंकट शिंदे यांनी महिलांचे कष्ट कमी करणारे तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. त्याच बरोबर स्वच्छ्ता अभियान अंतर्गत महिलांना स्वच्छतेचे महत्व सांगुन परीसर स्वच्छता करण्यात आली. या प्रसंगी श्री. गंगाधर कानगुलवार, श्री. विकास हांडे (Dhan)आणि इतर कार्यकर्ते उपस्थीत होते. #farm #sagroli #food #kvk #nanded #rural #women #empowerment #PoshanMaah #POSHANAbhiyaan #PoshanMaah2022 #kvksagroli #nanded #gangama #mandal #पोषण #बाग #अन्नसुरक्षा.

Comments are closed.