सोयाबीन कापणी सोपी करण्यासाठी सोयाबीन कापणी हातमोजेचा प्रभावी वापर….
November 4, 2022
हरभरा पिकातील एकात्मिक पीक व्यवस्थापन
November 4, 2022

प्रधानमंत्री किसान संमेलन अंतर्गत रब्बी शेतकरी मेळावा…

17 ऑक्टोबर 2022 , संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड अंतर्गत प्रधानमंत्री किसान संमेलन कार्यक्रमा निमित्त प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण व रब्बी शेतकरी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजमा पिकाला जीआय मानांकन मिळवून देणारे सातारा येथील प्रयोगशील शेतकरी श्री मधुकरराव कदम व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे होते. मा. पंतप्रधानांच्या दिल्ली येथील “प्रधानमंत्री शेतकरी सन्मान संमेलन” कार्यक्रमातील मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर रब्बी हंगामातील पिक बदल म्हणून राजमा पिकाच्या लागवडीपासून ते थेट विक्री पर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबत हरभरा पिकाला इतर पर्यायी पिके धने, करडई, हिवाळी उडीद व जवस इत्यादी पिकाची लागवड तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी बिलोली, देगलूर, धर्माबाद, उमरी,व नायगाव तालुक्यातील 210 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलूर ता. देगलूर येथील प्रयोगशील शेतकरी श्री अनिल तोताडे होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी बिलोली श्री बालाजी बच्चेवार व कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवानवर होत्या .उपस्थित शेतकऱ्यांपैकी 120 शेतकऱ्यांनी 130 एकरावर राजमा लागवडीसाठी नोंदणी केली आहे. कृषी विज्ञान केंद्रकडून राजमा लागवड ते विक्री पर्यंत या शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. #Agricultural #pmkisanyojana #pmkisansammannidhiyojana #PMNarendraModi #farmers #farming

Comments are closed.