गरीब कल्याण संमेलन व खरीप शेतकरी मेळाव्यास सगरोळी येथे हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती….!
June 7, 2022
समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक सोयाबीन अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा…
July 12, 2022

प्रयोगा अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण आणि निविष्ठा वाटप करण्यात आल्या.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत  तुर पिकासाठी समुह प्रथमदर्शनी प्रात्याक्षिक प्रयोग तळणी व चिंचाळा ता. बिलोली या दोन गावात प्रत्येकी २५ शेतकरी याप्रमाणे ५० शेतकऱ्यांच्या शेतावर एकूण ५० एकर क्षेत्रावर राबविण्यात आला.  प्रयोगा अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण आणि  निविष्ठा वाटप करण्यात आल्या. पेरणीपूर्व प्रशिक्षणादरम्यान डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना बीज उगवण तपासणी, बीजप्रकिया तसेच तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांना प्रयोगासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा वाटप करण्यात आल्या त्यामध्ये वनामवि, परभणी यांनी नुकतेच विकसित केलेले गोदावरी हे वाण देण्यात आले तसेच बीजप्रक्रियेसाठी आवश्यक असलेली जैविक खते (रायझोबियम, पीएसबी आणि केएमबी) आणि ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक देण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी आणि निविष्ठा वाटप कार्यक्रमासाठी एकूण ५० शेतकरी उपस्थित होते.

Comments are closed.