परसबागेतील कुक्कुटपालन करा आणि घराला आर्थिक हातभार लावा
October 30, 2021
अटकळी येथील बायोलॅब व जिरेनियाम प्लांट ला महिला बचत गटांची भेट…
October 30, 2021
“प्राण्यांच्या भल्यासाठी सेवा करणे हे नोबेल कार्य आहे आणि आजची मोहीम त्या दिशेने एक पाऊल आहे – डॉ. तामलूरकर, एलडीओ काटकलंबा”
आज 21/10/2021 रोजी, संस्कृती संवर्धन मंडळाच्या डब्ल्यूडीएफ पाणलोट प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त प्रयत्नातून काटकळंबा, ता. कंधार येथे एक पशु आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण 52 पशु मालकांनी आरोग्य तपासणीसाठी एकूण 324 जनावरे तपासणी करिता आणली होती. डॉ.शिवकुमार तमलूरकर, प. वि. अ. काटकळंब, डॉ. अरविंद दगडे, प. वि. अ, नांदेड आणि डॉ. निहाल मुल्ला, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यांनी सर्व प्राण्यांची तपासणी केली. प्राण्यांची तपासणी केल्यानंतर, आजारी प्राण्यांवर उपचार, प्रत्येक प्राण्याला उपयोगी सल्ला आणि औषधोपचार आणि संबंधित प्राण्यांच्या मालकांना रोगाच्या स्थितीची माहिती देण्यात आली. शिबिरामध्ये प्रामुख्याने गोचीड, उवा सारखे बाह्य परजिव आणि अंतर्गत परजीवीचा प्रादुर्भाव, अतिसार, दुधाळ म्हशींमध्ये दुधाचे कमी उत्पादन, वारंवार उलटणे किंवा गर्भधारणा न होणे सारख्या प्रजनन संस्थेतील आजार इ. आढळून आले. सर्व समस्याकरिता तज्ञ पशुवैद्यकांनी उपचार केले. शेतकऱ्यांना नियमित जंतनाशक आणि लसीकरणासह पूरक जीवनसत्त्वे, पशूंची शरीराची पोषक स्थिती सुधारण्यासाठी खनिज मिश्रणे आणि संपूर्ण आरोग्य सुधारणा करिता इतर उपायांचा सल्ला देण्यात आला. केव्हीकेच्या स्विकार्य कार्यक्रमाअंतर्गत माजावर न येणाऱ्या गुरांसाठी हार्मोनल थेरपी (संप्रेरकाच्या सहाय्याने उपचार) देखील देण्यात आली. पशुवैद्यकांनी शेतकऱ्यांना हार्मोन थेरपीसाठी नियमित माजावर न येणारी गुरे तपासणी आणि उपचार करिता आणण्याचे आवाहन केले.यासोबतच ट्रॉमॅटिक रेटिकुलोपेरिटोनिटिस (टीआरपी), ट्यूमर, हर्नियेशन यासारख्या काही गुंतागुंतीच्या आजारांचे निराकरण करण्याकरिता पशुवैद्यकिय अधिकार्यांनी फेरोस्कोपी (प्राण्यांच्या पोटातील धातूचे तुकडे शोधणे)करून त्याचे महत्त्व सांगितले तसेच बैलांमध्ये खच्चिकरण करून दाखवले. टीआरपी आणि इतर गुंतागुंतीच्या विकार असलेल्या संबंधित शेतकऱ्यांना रुमेनोटॉमी आणि इतर योग्य उपचारांचा सल्ला देण्यात आला. शिबिरामध्ये गर्दभांची तपासणी करून त्यांना उपचार व सल्ला डॉ. निहाल यांनी दिला.

Comments are closed.