गावाचा व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक गावाने पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे….
December 12, 2022
मिरची पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन…
December 12, 2022

भाजीपाल पिकामध्ये चांगली प्रतीचे आणि जास्त उत्पन्न मिळण्यासाठी शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर करणे गरजेचे….

संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत कुंचेली ता नायगाव येथे भाजीपाला पिकामध्ये शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर या विषयावर शेती दिन साजरा करण्यात आला. भाजीपाल पिकामध्ये चांगली प्रतीचे आणि जास्त उत्पन्न मिळण्यासाठी शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर करणे गरजेचे असते, त्या अनुशंगाने कुंचेली येथे भाजीपाला पिकामध्ये शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर करणे या तंत्रज्ञाचा प्रथम रेषीय प्रात्यक्षिक घेण्यात आलेले होते. या अंतर्गत गावतील एकूण १३ शेतकर्यांना अर्का शुक्ष्म अन्नद्रव्य फवारणी करण्यासठी वाटप करण्यात आले होते. भाजीपाला उत्पादक यांनी शुक्ष्म अन्नद्रव्यचा वापर हा वांगी या पिकावर केला. वांगी लागवड केल्यानंतर ४५ दिवसांनी पहिली फवारणी करण्यात आली, व त्यानंतर दर २५ दिवसांनी अर्का शुक्ष्म अन्नद्रव्याच्या नियमित फवारणी घेण्यात आली,यामुळे पिकाची फुल धारणा आणि फळ धारणा चांगल्या प्रमाणात दिसून आली तसेच उत्पन्नात देखील वाढ झाली अशी प्रतिक्रिया कार्यक्रमा दरम्यान शेतकर्यांनी दिली. #vegetables #भाजीपालाशेती #शुक्ष्म #अन्नद्रव्य #kvk #kvksagroli #nanded #agricultural

Comments are closed.