जमिनीचे आरोग्य व माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, रब्बी पीक संरक्षण, उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
December 7, 2021शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा – डॉ डी बी देवसरकर
December 9, 2021
मृदा संवर्धन काळाची गरज – श्री.रविशंकर चलवदे.
कृषी निविष्ठा विक्रेत्यां नी केवळ कृषी निविष्ठा विक्रेता म्हणून न राहता कृषी व्यवसाय व्यवस्थापक म्हणून शेतकऱ्यांना सर्व माहिती व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात म्हणून कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे मॅनेज हैदराबाद पुरस्कृत कृषी निविष्ठा विक्रेत्यां करिता कृषी पदविका अभ्यासक्रम चालू केला असून या अभ्यासक्रमास 40 कृषी सेवा केंद्रचालकांनी प्रवेश घेतला आहे दर रविवारी या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यात येत असून आज 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.रविशंकर चलवदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद साधला यावेळी जमिनीचे आरोग्य या विषयावर प्रा.व्यंकट शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच माती तपासणी करिता मातीचा नमुना कशा रीतीने घेतला जातो याचे प्रात्यक्षिकही या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक प्रा.तुकाराम मंत्रे यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्याकडून करुन घेतले.