कौशल्य विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान अंतर्गत “उन्हाळी भुईमूग लागवड घुगे पॅटर्न ” पेरणीपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिकातिल शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवठा
March 23, 2022
शेळी पालन म्हणजे “Any Time Money”
March 24, 2022

रसायन मुक्त होळी – काळाची गरज ..

होळी/ रंगपंचमी साजरी करताना वापरात येणाऱ्या रंगांमध्ये हानीकारक रसायने असतात. ज्यामुळे त्वचा खराब होवुन नाक, कान, घसा व डोळ्यांना देखील हानी होते. अशी रसायनयुक्त रंग वापरल्यामुळे आरोग्य तर धोक्यात येतेच त्यासोबत हे रंग काढण्यासाठी पाण्याचा देखील अती वापर होतो. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि होळी आणि रंगपंचमी सारखा आनंदाचा सन आणखी आनंदी करण्यासाठी होळीचे नैसर्गिक , रसायांमुक्त रंग अतिशय फायद्याचे ठरतात.  हे नैसर्गिक रंग तयार करून महिला छोटा गृह उद्योग देखील सुरू करू शकतात. याच उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, सागरोळी तर्फे आज दि. 20/1/2022 रोजी नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण कोकलेगाव ता. नायगाव येथील महिलांना देण्यात आले. या रंगांचे महत्त्व सांगून बनवण्याची पद्धत सविस्तर करून दाखविण्यात आली. कोकलेगाव येथील महिला या वर्षीच्या रंगपंचमीसाठी हे नैसर्गिक रंग तयार करून बाजारात आणणार आहेत. #color #colourful #coloring #colorful #colors_of_day #holi #holistic #holicelebration🎉 #holipowder #holifestival #holifestivalindia #chemicalfree #chemical #safe #natural #naturalcolor #naturalcolours #kvk #sagroli #nanded #रंग #रंगपंचमी #नैसर्गिक #होळी #होळीस्पेशल😍 #होळी_रे_होळी🔥

Comments are closed.