दि. 11 अक्टोबर 2022 , मंगळवार संस्कृती संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र सगरोळी जि नांदेड कडून “राजमा लागवड तंत्रज्ञान” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळाळेचे आयोजन करण्यात आले होते. परंपरागत हरभरा पिकात कमी उत्पादकता व हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कंटाळला आहे. रब्बी हंगामामध्ये पर्यायी पिकांची (धने,करडई,राजमा ,हिवाळी उडीद,जवस इ ) शेतकऱ्यांकडून विचारपूस होत आहे. मराठवाड्यात राजमा पिकाखालील सातत्यपूर्ण क्षेत्र वाढ लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिकाची माहिती व्हावी यासाठो एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत “राजमा शेती” च्या लागवडी पासून ते काढणी आणि मार्केट लिंकेज पर्यंत च्या विविध विषयांवर कृषि विज्ञान केंद्र सगरोळी चे विषय विशेषज्ञ प्रा .कपिल इंगळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राकडून राजमा शेतीच्या प्रायोगिक तत्त्वावरील लागवडीसाठी बेळकोणी (बु), माचनूर तालुका बिलोली व शहापूर तालुका देगलूर या गावाची निवड केली असून येणाऱ्या रब्बी हंगामासाठी 100 पेक्षा अधिक एकरावर लागवडीचे नियोजन आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख श्री वेंकट शिंदे यांनी मांडले . या कार्यक्रमासाठी अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी बेळकोनी व महात्मा बसवेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी माचनूर च्या 60 पेक्षा अधिक सभासद शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. #agricultureworldwide#agricultural#agricultureandfarming#farmers#ClimateSmartAgriculture#kvk#sagroli#nanded#शेतकरी#शेत#शेती#ItAllStartsWithTheSeed