शेती व्यवसायाला पशुपालन सारख्या जोडधंद्याची सोबत लाभली तर शेतकऱ्याची निश्चितच प्रगती होण्यास मदत होते.
January 13, 2022
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेdतीचा स्वीकार करून आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत राहावे -डॉ.आरती वाकुरे
January 13, 2022

रेशीम उद्योग हा सर्वात फायदेशीर शेती पूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाद्वारे याचे तंत्रज्ञान आत्मसात करून घ्यावे – रेशीम उपसंचालक श्री दिलीप हाके यांचे प्रतिपादन.

वातावरण बदला मुळे शेतीवर होणारे अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन शेतीपूरक व्यवसायास चालना मिळावी म्हणून संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्रातील उत्कर्ष लर्निंग सेंटर येथे राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या सहकार्याने रेशीम उद्योगाच्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणास आज सुरुवात झाली. प्रशिक्षणाचे उद्घाटन औरंगाबाद विभागाचे रेशीम उद्योग उपसंचालक श्री.दिलीप हाके यांनी केले असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ.चंद्रकांत लटपटे यांनी प्रशिक्षणार्थ्याना,तुती लागवड व व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.
दुपारच्या सञात जालना जिल्हा रेशीम अधिकारी श्री अजय मोहिते यांनी रोपवाटिका लागवड व व्यवस्थापन विषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले .या प्रशिक्षणा दरम्यान सुजलेगाव ता. नायगाव येथील तरुण शेतकरी श्री संदीप कदम यांनी रेशीम उद्योगा विषयी आपले अनुभव सगळ्यांना सांगितले.या नंतर कृषी विज्ञान केंद्राच्या रेशीम युनिट व तुती लागवड प्रक्षेत्राला शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.या प्रशिक्षणा मध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनासोबत च धनगरवाडी ता.लोहा येथील रेशीम उद्योग प्रकल्पाला देखील प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेट देऊन प्रशिक्षण दिल जाणार आहे. #trainingcenter #sericulture🐛 #kvk #Sagroli #कृषिवेद #krushived #रेशीम #नाबार्ड #nanded #youth #youthdevelopment #skilling #skill #skills #agriculture #agricultureworld #agriskills #agribusiness #entrepreneur #entrepreneurship #agrientrepreneur #ruralyouth #employment #employmentopportunities #employmentopportunity #unemployment #selfemployment #agri #sericulture

Comments are closed.