कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे उत्कर्ष लर्निंग सेंटर आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विज्ञामानाने ग्रामीण भागातील युवकांसाठी आणि शेतकार्यानसाठी तीन दिवसीय रहिवाशी रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदरील प्रशिक्षणा अंतर्गत युवकांना रोपवाटिका उभारण्यासाठी लागणारे पॉली हाउस आणि शेडनेट या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली तसेच भाजीपाला आणि फळपिक रोपे निर्मिती आणि व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान नांदेड जिल्यातील व्यावसायिक भाजीपाला तसेच फळरोपवाटीकेस भेट देण्यात आली व रोपवाटिका व्यवस्थापनमधील विवध बाबींची माहिती घेण्यात आली. #NABARD #farmer #rural #youth #agritech #agricultural #agri #narsary #plantation #plantmedicine #plant #vegetableseeds #vegetable #greenhouse