पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी तारेचा आकडा करून लिंबू तोडणी करतात. लिंबू तोडणी करताना जमिनीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे 20 टक्के लिंबू खराब होवुन आर्थिक नुकसान होते. तसेच माती, चिखल लागल्यामुळे लिंबू धुऊन मगच पोत्यांमध्ये भरावे लागतात. लिंबाच्या झाडांच्या काट्यांमुळे देखील शेतकऱ्यांना व शेतकरी महिलांना लिंबू तोडणीचा त्रास होतो. हा सर्व त्रास कमी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीं मार्फत आज दि. 10/6/2022 रोजी नागठाणा, तालुका उमरी येथील लिंबाच्या शेतकऱ्यांना लिंबू तोडनी यंत्राचे प्रशिक्षण देऊन प्रथम दर्शनी प्रात्यक्षिका अंतर्गत लिंबू तोडणी यंत्र देण्यात आले. या यंत्राच्या साहाय्याने लिंबू सहज तुटून जोडलेल्या पाईप मध्ये जमा होतात, जमिनीवर पडत नाहीत व नंतर शेतकरी सहज पोत्यात किंवा पिशवीत भरून पॅक करू शकतात. या मुळे शेतकऱ्यांचे लिंबाचे होणारे नुकसान होत नाही आणि त्रास देखील वाचतो. #fruit#kvk#sagroli#nanded#fruitsandvegetables#AcidLime#acidlime?? #newtechnologies#citrus_fruits#kagzi_lime#lime#lemon#harvester#लिंबू_तोडनी#यंत्र#farmers#farming#furit_orchard