किड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा एकात्मिक वापर करून पर्यावरणाला अनुकूल असे किड व्यवस्थापन करावे…… डॉ. कृष्णा अंभुरे
October 7, 2021
Financial Literacy Program in coordination with DRISHTI..
October 30, 2021

व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी ची जाण ठेऊन शेतकऱ्यांना योग्य तेच मार्गदर्शन करावे व आवश्यक तेवढ्याच निविष्ठा देऊन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावे….डाॅ.तानाजी चिमनशेट्टे यांनी असे आवाहन केले

संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे, वनामती नागपुर व राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान (NIPHM) हैद्राबाद व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील किटकनाशके विक्रेत्यां करिता कीटकनाशक व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृती संवर्धन मंडळाचे संचालक श्री.रोहित देशमुख उपस्थित होते तर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डाॅ.तानाजी चिमनशेटे हे होते. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन व राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान हैदराबाद या राष्ट्रीय पातळीवरील संस्थांची नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून काम करीत असून, कृषी विज्ञान केंद्रा मध्ये कृषी सेवा केंद्र परवाना धारकां साठी विविध अभ्यासक्रम चालवले जात आहेत. त्याच कार्यक्रमा अंतर्गत

कीटकनाशके विक्रेत्यांना कीटकनाशक व्यवस्थापनाची माहिती व्हावी तसेच त्यांना या क्षेत्रातील नियम व कायद्यांची माहिती होऊन,

त्यांच्या व्यावसायिक कार्यक्षमते वाढ व्हावी या उद्देशाने केन्द्र शासनाने राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान हैद्राबाद यांच्या मार्गदर्शनाखाली 12 आठवड्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला असून त्या अभ्यासक्रमाच्या उदघाटन कार्यक्रमात बोलताना जिल्हा कृषी अधिकारी जि प नांदेड डॉ.चिमनशेटे यांनी उपस्थित कृषि किटकनाशक विक्रेते बांधवां सोबत संवाद साधत सखोल मार्गदर्शन केले. आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी ची जाण ठेऊन शेतकऱ्यांना योग्य तेच मार्गदर्शन करावे व आवश्यक तेवढ्याच निविष्ठा देऊन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावे असे आवाहन केले.

….अध्यक्षीय भाषणात श्री.रोहीत देशमुख यांनी किटकनाशक विक्री करत असतानाच पर्यावरणाच्या रक्षणासंबंधी भान ठेवत कार्य करावे असे मनोगत व्यक्त केले…..

सदरील कार्यक्रमासाठी नविन अॅग्रो नांदेड चे श्री.दिवाकर वैद्य, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डाॅ.सुरेश कुलकर्णी, प्रशिक्षण व शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा.व्यंकट शिंदे, विषय विषेयज्ञ डाॅ.कृष्णा अंभोरे व कृषि सेवा केंद्र चालकांची उपस्थिती होती. #trainingday #kvk #Sagroli #Nanded #NIPHM #वनामती #नागपुर #atma 

Comments are closed.