ट्रॅक्टर चलित सबसाॅइलर चे प्रात्यक्षिक व नाविन्यपुर्ण शेती यांत्रिकीकरणाची सखोल माहितीव्हावी यासाठी भाडे तत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्र (CHC) चालकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते ….
July 12, 2022
लिंबू तोडनी यंत्राचा प्रभावी वापर…
July 12, 2022

शहापूर येथे “सोयाबीन पिक परिसंवाद” संपन्न…

या सोयाबीन पीक परिसंवादात सोयाबीन लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान ज्यात सोयाबीनची बीबीएफ व टोकण पद्धतीने लागवड, जमिनीच्या प्रकारानुसार व पाणी उपलब्धतेनुसार वाणाची निवड, बीज प्रक्रिया, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन व अल्प खर्चिक पद्धतीचा अवलंब करून कीड व रोग व्यवस्थापन यावर भर देण्यात आला. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व बेस्ट ऍग्रो लाईफची शास्त्रज्ञ श्री सारा नरसिंह व श्री नामदेव घुले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शहापूर व परिसरातील 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती होते. दिनांक १० जून २०२२, शुक्रवार मौजे शहापूर तालुका देगलूर येथे बेस्ट ऍग्रो लाइफ लिमिटेड व कृषी विभाग तर्फे सोयाबीन पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. #farmers #farming #soybeanoil #soyabeanfarming #Soyabean_Oil #soyabean #kvk #sagroli #nanded #सोयाबीन✌️? #सोयाबीन_पेरणी #सोयाबीन_बिजोत्पादन #सोयाबीन_काढणी✌️? #बीबीएफ #टोकण_पद्धतीने_लागवड #बीज_प्रक्रिया #माती_परीक्षणाचे_फायदे #खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन

Comments are closed.