शाश्वत उपजीविकेसाठी शेती व बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते… प्रसंगी डॉ. कृष्णा अंभुरे
संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व परिवर्तन संस्था सोमठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि तंत्र विद्यालय,सुगाव (कॅम्प) ता.मुखेड येथे शाश्वत उपजीविकेसाठी शेती व बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते… प्रसंगी डॉ. कृष्णा अंभुरे यांनी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हवामानातील बदलानुसार होणारा किड व रोगांचा प्रादुर्भाव याविषयी माहिती दिली आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करताना पिक फेरपालट,बीजप्रकिया, कामगंध सापळे,चिकट सापळे,वनस्पतीजन्य किटकनाशक,जैविक किटकनाशक तसेच शिफारशीतील रासायनिक किटकनाशकांचा वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तर डॉ.संतोष चव्हाण यांनी बदलत्या हवामानात फळबाग व्यवस्थापनासह, एकात्मिक पिक पद्धतीविषयी मार्गदर्शन करताना फळबाग, भाजीपाला लागवड व फुलशेती या विषयावर मार्गदर्शन केले तर प्रशिक्षण विभागातील प्रा.तुकाराम मंत्रे यांनी कृषी विज्ञान केंद्रा मार्फत चालणाऱ्या विविध प्रशिक्षणा बरोबरच प्लंबिंग अभ्यासक्रमा विषयी माहिती देऊन ग्रामीण भागातील तरुणांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. #pest #training #climateresilientagriculture #crop #pattern #agriculture #kvk #sagroli #nanded #farm #farmer #AzadiKaAmritMahotsav #शेतकरी #शेत #शेती #ClimateChange #Climate_smart_agriculture