शेतकरी संशोधक विकसित हरभरा वाण सलेक्शन1++ पीक पाहणी कार्यक्रम
संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व कृषी विभाग धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “शेतकरी संशोधक विकसित हरभरा वाण सलेक्शन1++ पीक पाहणी कार्यक्रम व शेती दिन” मौजे बाभळी ता. धर्माबाद येथील प्रयोगशील शेतकरी श्री अशोक दमकोंडवार यांच्या शेतावर घेण्यात आला .या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हवामान अभ्यासक श्री पंजाब डक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा नांदेड श्री रविशंकर चलवदे व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी चे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे होते. हवामान अभ्यासक श्री पंजाब डक यांनी हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित शेती तसेच हवामान अंदाज, गारपीट, चक्रीवादळ व वीज पडणे इत्यादी हवामान संकल्पना शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या .श्री रविशंकर चलवदे त्यांनी नांदेड जिल्हा सोयाबीन व हरभरा बिज उत्पादनामध्ये अग्रेसर व आत्मनिर्भर असल्याचे सांगितले व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शेतकरी लाभाच्या ,शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांसाठी योजना सविस्तर मांडल्या. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी हरभरा वाण सलेक्शन ++ याची वैशिष्ट्ये व लागवड पद्धत व पीक बदल जिल्ह्यामध्ये शक्य असल्याचे सांगितले. प्रयोगशील शेतकरी श्री अशोक दमकोंडवार यांनी सेलेक्शन 1 ++ वाण विषयी विषयी आपले अनुभव कथनात या वाणाची लागवड 2.5 ते 3 फूटावर केलेली असून एका झाडाला 800 ते 1200 घाटे धारणा आहे व हा वाण मर व मूळकूज रोग मुक्त आहे व 16 ते 18 क्विंटल प्रति एकरी उत्पादन अपेक्षित आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी धर्माबाद, बिलोली ,देगलूर तालुक्यातील 100 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील जाधव रोशनगावकर होते. #FarmerIndia#farmerschallenge#farming#farmers#शेतकरी#शेतकऱ्यांना#संशोधक#हरभरा#वाण#पिक#कार्यक्रम#हरभरा_शेती#हरभरा_शेती#हरभरा_सल्ला#हरभरा_पिक_सल्ला#हरभरा_पेरणी#kvk#sagroli#Nanded#कृषि_विभाग_नांदेड#कृषि_विभाग#आत्मानिर्भर_भारत#आत्मा#नांदेड#AtmanirbharBharat#ATMA