शेतकर्यांनी घेतले विविध सुगंधी वनस्पती लागवड व डिस्टिलेशन युनिट उभारणीचे धडे…..
संस्कृती संवर्धन मंडळ उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून “विविध सुगंधी वनस्पती लागवड व डिस्टिलेशन युनिट उभारणी”या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन उपकेंद्र अटकळी तालुका बिलोली येथील प्रक्षेत्रावर करण्यात आले .या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध सुगंधी वनस्पती ज्यात जिरेनियम , सिट्रोनेला, लेमनग्रास, वाळा, दवणा इत्यादी पिकांची लागवड व प्रक्रिया उद्योग उभारणी या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी शेतकऱ्यांनी प्रक्षेत्रावर जिरेनियम पिकापासून प्रत्यक्ष तेलनिर्मिती प्रात्यक्षिक देण्यात आले तसेच कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आलेल्या 7.5 एकर प्रक्षेत्रावरील जिरेनियम पिकाची पाहणी शेतकऱ्यांनी केली .या एक दिवसीय कार्यशाळेत सुगंधी वनस्पती लागवड केलेले शेतकरी उद्योजक श्री शिवशंकर धोंडगे बाचोटी ता. कंधार व श्री स्वप्निल बोडके धनज ता. मुखेड यांनी जिरेनियम पिकाविषयी आपले अनुभव कथन केले . कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी “सुगंधी वनस्पती लागवड व भविष्यातील संधी” प्रामुख्याने जिरेनियम, सिट्रोनेला, लेमनग्रास, व वाळा पिकाच्या लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिया विक्री व्यवस्थापन या विषयी माहिती दिली . डिस्टिलेशन प्रक्रिया तज्ञ श्री अरविंद मुंगडे व श्री येशू यांनी डिस्टिलेशन युनिट खरेदी करते वेळेस घ्यावयाची काळजी व प्रक्रिया बद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विनोद देशमुख होते व प्रास्ताविक प्रा. व्यंकट शिंदे यांनी केले. या कार्यशाळेसाठी नांदेड जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
#training #trainingcenter #trainingday #Distillation #traininganddevelopment #farmers #farmerindia #सुगंधी #सुगंधीतेल #वनस्पती #लागवड #डिस्टिलेशन #युनिट #rural #youth #जिरेनियम #सिट्रोनेला #लेमनग्रास #वाळा #दवणा #पिकांची #प्रक्रिया #उद्योग #उभारणी #kvk #sagroli #पिक #जिरेनियम_शेती #geraniumessentialoil
#geranium #geraniumfarming #जिरेनियमची_रोपे #जिरेनियम_शेती_व्यवस्थापन
