खरीप हंगामात जाणवणारा बियाण्यांचा तुटवटा आणि बाजारात मिळणाऱ्या महाग बियाण्यांची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ऊन्हाळी सोयाबीन या पिकाला प्राधान्य दिले.
May 10, 2022
“किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” अभियानांतर्गत शेतकरी मेळावा…
May 10, 2022

शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे…

दोन दिवसीय नैसर्गिक शेती या विषयावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात नैसर्गिक शेती म्हणजे काय? शेतावर तयार करण्यात येणाऱ्या विविध जैविक निविष्ठा, जैविक खते व कीडनाशके वापर, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण व विक्री व्यवस्था इत्यादी विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा जीवामृत, बीजामृत ,अमृतपाणी, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, वेस्ट डीकंपोजर व ई एम वापर ,कंपोस्ट खत व गांडूळ खत निर्मिती, निमास्त्र ,गो -कृपाअमृत इत्यादी निविष्ठा निर्मिती चे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या नैसर्गिक शेतीला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. सर्व प्रशिक्षणार्थींना जैविक निविष्ठा वेस्ट डीकंपोजर व ट्रायकोडर्मा बुरशीनाशक व सेंद्रिय शेती पुस्तिका देण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व व्यंकट शिंदे व प्रशिक्षण समन्वयक श्री तुकाराम मंत्री यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी धर्माबाद व माहूर तालुक्यातील 67 महिला व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. #training #trainingprogram #trainingmotivation #traininganddevelopment #trainingday #organicfarming #organic #organicfood #agricultural #Natural #FarmingChallenge #kvk #sagroli❤️? #Nanded #womenempowement #womenempowered #ruralindia #farm #farmer #नैसर्गिक_शेती #नैसर्गिक_सौंदर्य?? #शेतीवाडी? #सेंद्रिय #गो -कृपाअमृत
 

Comments are closed.