शेती व्यवसायाला पशुपालन सारख्या जोडधंद्याची सोबत लाभली तर शेतकऱ्याची निश्चितच प्रगती होण्यास मदत होते.
याच अनुषंगाने संस्कृती संवर्धन मंडळ संचालित, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे “व्यवसायिक कुकुटपालन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 18 ते 20 डिसेंबर 2021 दरम्यान घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये कुक्कुटपालन व्यवसायातील उद्दीष्टे आणि संधी, व्यवसायिक कुक्कुटपालनाची विविध प्रकार, शेडची बांधणी, शेडचे व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, घरगुती खाद्य तयार करण्याची प्रक्रिया, कुक्कुट पक्ष्यांच्या विविध अवस्थेतील व्यवस्थापन, लसीकरण, जैविक संरक्षण आणि रोग निवारण व व्यवस्थापन आणि व्यवसायातील विविध संधी अशा विविध विषयांवरती प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिका द्वारे मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थींना स्वतः अनुभव घेण्याची संधी देण्यात आली. या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये शेतकरी सहलीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना वसमत येथील आधुनिक कुक्कुटपालनाच्या शेडला भेट देऊन तिथल्या एकंदर होणाऱ्या व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी एकूण 40 प्रशिक्षणार्थींनी आपली उपस्थिती नोंदवली.
#Poultry #Farming #Animal
#Commerical #Broiler #DeshiPoultry #Layer #Training #Chicken #kvk #sagroli #animal #AzadiKaAmritMahotsav #agriculture #farm
#krushived #कृषिवेद #farmer #व्यवसायिक #कुकुटपालन #प्रशिक्षण