ग्रामीण भागात महिला घरकामासोबत अनेकदा शेतीकामात व्यस्त असतात. यामध्ये त्यांच्या साहाय्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. याच अनुषंगाने महिलांनी एकत्र येऊन गटाने व्यवसाय करावा या अपेक्षेने ता. उमरी येथून आलेल्या महिला बचत गटातील महिलांसाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे एकदिवसीय “उस्मानाबादी शेळीपालन” या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उस्मानाबादी शेळी ची वैशिष्ठे, आहार व्यवस्थापन, प्राथमिक तपासणी, आजार आणि लक्षणे , लसीकरण, जंतू निर्मूलन, चारा नियोजन आणि विक्री बाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी एकूण 31 महिलांनी सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमासाठी रिलायन्स फाऊंडेशन कडून सहायता करण्यात आली. प्रशिक्षणार्थींना कार्यक्रम नंतर प्रोत्साहन देण्याकरिता शेळीपालन साठी आवश्यक असलेले किट देण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट हा कृषी विज्ञान केंद्राच्या शेळीपालन युनिटला भेट देऊन आणि प्रात्यक्षिक दाखवून करण्यात आला. #जनावरे #SHG #womeninbusiness #womensupportingwomen #KrishiVigyanKendra #kvksagroli #farmers #animal #animallovers #care #animals