शेळी पालन म्हणजे “Any Time Money”
उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषि विज्ञान केंद्र,सगरोळी येथे नाबार्ड अंतर्गत शास्ञोक्त शेळीपालन प्रशिक्षण संपन्न. वातावरण बदलाचे कृषी क्षेत्रावर होणारे अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन ग्रामीण भागातील युवकांनी शेती पूरक व्यवसायाकडे वळावे तसेच जे तरुण या क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा या साठी नाबार्ड च्या साहाय्याने उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे शास्त्रोक्त शेळी पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचे उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ , नागपूर चे संचालक, कृषि विस्तार प्रा.डॉ. अनिल भिकाने यांनी शास्त्रोक्त शेळीपालना तील चतुःसूत्री बद्दल शेतकऱ्यांशी संवाद साधला तर नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापाक श्री राजेश धुर्वे यांनी शेळीपालन प्रशिक्षणाचे महत्व विशद करून विपणन व्यवस्थापन व बँकेच्या बाबतीत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. विशेष अतिथी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी चे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.नितीन मार्कंडेय यांनी प्रजनन व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणा मध्ये शल्य चिकित्सक व क्ष किरण शास्त्र तज्ञ डॉ. गजानन ढगे यांनी शेळ्यांचे आजार,लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, या विषयी सादरीकरण केले. या सोबतच आटपाडी येथील शेळी तज्ञ श्री प्रसाद देशपांडे, पशु वैद्यकीय महाविद्यालय परभणी चे डॉ. विनायक इंगळे, डॉ.एम बी ए सिद्दिकी,डॉ. सुहास अमृतकर यांनी संगोपन पद्धती,गोठ्याचे व्यवस्थापन , आहार व्यवस्थापन, शेळी पालनाचे अर्थशास्त्र या विषयी सविस्तर मार्गदर्शन व शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली तर पशुधन विकास अधिकारी डॉ. शिरीष गळाकाटू यांनी शेळीपालनाच्या शासकीय योजना विषयी शेतकऱ्यांना अवगत केले. या प्रशिक्षणा दरम्यान कृषी विज्ञान केंद्रा च्या बंदिस्त शेळीपालन प्रकल्प, रोषनगाव ता. धर्माबाद व टाकळी वाझिरगाव ता. नायगाव येथील श्री साईनाथ शिवशेटे व डॉ.अशोक मोरे यांच्या शेळीपालन प्रकल्पांस प्रक्षेत्र भेटीचे आयोजनही करण्यात याआले होते.प्रक्षेत्र भेटी दरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. निहाल मुल्ला यांनी दैनंदिन व्यवस्थापनातील त्रूटी शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या.
#skill #skills #SkillIndia #SkillsForLife #kvk #nanded #sagroli #skillsdevelopment #GOAT #goatfarm #goatfarmin #trainingcenter #training
