वर्षानुवर्ष जमिनीची मशागत एका विशिष्ट खोलीपर्यंत करीत राहिल्याने तिच्या खालील थर घट्ट बनतो. शेतामध्ये नांगराचा सलग व सतत काही वर्ष वापर केल्यास तसेच शेतीतील इतर कामांकरिता अवजड ट्रॅक्टर्स किंवा अवजड अवजारांचा सातत्याने वापर केल्यास जमिनीखाली कठीण थर निर्माण होतो त्यालाच hard pan असे म्हणले जाते. या तयार होणाऱ्या घट्ट थरामुळे जमिनीतील हवेचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीत पाणी साठून राहते व पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही. पाणी मुरण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो म्हणून जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढते व जमिनीची धूप होते. या सर्वांचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो. त्या करिता नेहमीपेक्षा खोल नांगरट अधूनमधून (२ वर्ष तून एकदा करावे) केल्यास हा घट्ट थर मोकळा होतो व पाण्याचे शोषण जास्त प्रमाणात होते. त्यासाठी ‘सबसॉयलर’ ह्या अवजाराचा चांगला उपयोग होतो. दि. १०/०६/२२ या दिवशी गाव बेटमोगरा ता.मुखेड येथे Vibrating Subsoiler चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यात आले. #farmer #Vibrating #Subsoiler #deep_tillage #subsoilingmachine #moisture_conservation_technique #water #soil #prévention #hard_pan #machine #machinery #water_stagnation #save_motioure #deep #plough #single #tyne_subsoiler #vibrosubsoiler #kvk #sagroli #nanded #अवजार #अवजारे #खोल_नांगरट #सबसॉयलर #save